IPO म्हणजे काय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती | What is IPO in Marathi ?

IPO म्हणजे काय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती | What is IPO in Marathi ?

What is IPO in Marathi ?

 

शेअर मार्केटमध्ये दिवसेंदिवस गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. शेअर मार्केटशी संबंधित असणाऱ्या लोकांनी IPO (What is IPO in Marathi ?) हा शब्द नक्कीच ऐकला असेलच. पेपरमध्ये देखील आपण बऱ्याचदा वाचतो अमक्या अमक्या कंपनीचा IPO येणार आहे. आपल्या ओळखीतल्या कोणीतरी IPO मध्ये गुंतवणूक करून कमी वेळात नफा कमावलेला असतो.  पण आपल्याला IPO म्हणजे नक्की काय असते ? IPO मध्ये काय करावे लागते ? त्यामध्ये आपण गुंतवणूक कशी करू शकतो ? असे अनेक प्रश्न आपल्याला नक्कीच पडलेली असणार. आजच्या या लेखात आपण आपल्या या सर्व प्रश्नांची जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो मग IPO बद्दल संपूर्ण माहिती अगदी सोप्या पद्धतीने आपल्या भाषेत बघणार आहोत.

IPO म्हणजे काय ? IPO चा FULL Form काय आहे ? What is the full form of IPO ?

मित्रांनो IPO चा फुल फॉर्म Initial Public Offering हा आहे.  आपल्या मराठी भाषेत IPO ला ‘प्राथमिक सार्वजनिक भागविक्री’ असे म्हटले जाते.

IPO म्हणजे काय आहे ? What is IPO ?

जेव्हा एखादी कोणतीही खाजगी कंपनीला (Private company) आपल्या व्यवसायात वाढ करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भांडवलाची(रुपयांची) आवश्यकता असते त्यावेळी ती खाजगी कंपनी अगोदरच आपले शेअर्स सर्वसामान्य जनतेला खरेदी करण्यासाठी शेअर बाजारात खुले करते.परंतु हे शेअर प्रत्येकालाच खरेदी करता येतात असे नाही. हे शेअर लॉटप्रमाणे खरेदी करता येतात आणि लॉटरी प्रमाणे IPO चे कार्य चालते. ज्या कोणाचा नंबर लागला त्याला IPO लागतो. वर सांगितलेल्या संपूर्ण प्रक्रियेलाच IPO असे म्हटले जाते.

कंपनी आपला IPO शेअर बाजारात आणल्यावर ती कंपनी शेयर बाजारात NSE ( National Security Exchange यालाच निफ्टी असे म्हणतात) वा BSE (Bombay Stock Exchange) मध्ये लिस्ट होते. अशा प्रकारे त्या खाजगी कंपनीचे रुपांतर होते.ती खाजगी कंपनी आता Public Limited Company बनते. या IPO च्या प्रक्रियेनंतर कोणताही सर्वसामान्य व्यक्ती त्या कंपनीचे शेअर खरेदीची वा विक्री करू शकतो.

हे ही वाचा : शेअर मार्केट म्हणजे काय ? नवशिक्यांसाठी संपूर्ण माहिती | Share Market Basics In Marathi

कंपनी आपला IPO शेअर बाजारात का आणतात ? What is IPO in Marathi ?

तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल की कंपनी आपला IPO शेअर बाजारात का आणतात ? चला तर मग या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ या.

  • आपल्या व्यवसायात वाढ करण्यासाठी –

कंपनीला आपला  व्यवसाय वाढविण्यासाठी, एखादी नवी कंपनी सुरु करण्यासाठी, आवश्यक असलेले नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी कंपनीला खूप मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. अशा वेळी कंपनी शेअर बाजारात आपला IPO आणते.

कंपनीचे कर्ज फेडण्याकरिता –

बऱ्याच कंपन्या त्यांच्यावरील असलेले जुने कर्ज फेडण्याकरिता देखील IPO शेअर बाजारात आणतात. IPO मधून उभारलेले रुपये कंपनी स्वतःवरील कर्ज फेडण्याकरिता वापरते.

कंपनीची अधिकृत नोंदणी करण्याकरिता  –

आपल्या कंपनीचा IPO बाजारात आणून कंपनी स्वतःची अधिकृतरीत्या शेअरबाजारात प्रवेश करते.

IPO ची प्रक्रिया कशी असते ? –

कोणतीही कंपनी एकाच दिवसात IPO शेअर बाजारात आणू शकत नाही. त्या करिता संबंधित कंपनीला प्रक्रियेतून जावे लागते. ही प्रक्रिया पुढे दिलेल्या माहितीच्या आधारे समजावून घेऊ या.

इन्व्हेस्टमेंट बँकर्सची नियुक्ती करणे (Appointment of  investment bankers) –

IPO आणण्यासाठी कंपनीला शेअर बाजारातील तज्ज्ञ बँकांची  मर्चंट बँकर वा लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती केली जाते. या बँकांमध्ये SBI CAPITAL, ICICI SECURITIES, AXIS CAPITAL  असतात. या बँका संबंधित कंपनीला IPO च्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मदत करीत करतात.

सेबीकडे नोंदणी  करणे – What is IPO in Marathi ?

सर्वप्रथम सेबीकडे संबंधित कंपनीची नोंदणी केली जाते. वर सांगितलेल्या इन्व्हेस्टमेंट बँकर्स कंपनीच्या आर्थिक स्थितीचा पूर्ण अभ्यास करून DRHP (Draft Red Herring Prospectus) फाइल म्हणजे पाठविली जाते . या फाइल मध्ये संबंधित कंपनीची सर्व माहिती, भांडवल, नफा, आणि शेअर बाजारात IPO आणण्याचे कारण नमूद करून सेबीकडे मंजुरीकरिता ही फाइल पाठवली जाते.

सेबीने संबंधित कंपनीला मंजुरी दिल्यानंतर कंपनीचा IPO शेअर बाजारात केंव्हा आणायचा. शेअरची किंमत (Price Band) किती ठेवायची जसे की 800 ते 820 रुपये. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांना किती शेअर खरेदी करावे लागतील. यामध्ये लॉट साइझ असते.

IPO शेअर बाजारात खरेदीसाठी खुला होणे – (IPO Bidding)

शेअरची  Price Band, लॉट साइज  ठरल्यानंतर IPO 3 ते 5 दिवसांसाठी शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी खुला केल्या जातो. गुंतवणूकदार आपल्या Demat Account वरून खरेदीसाठी apply करतात. जो पर्यंत IPO ची प्रक्रिया पूर्ण होत नाहीत तोपर्यंत IPO साठी आवेदन करणाऱ्यांचे रुपये बँकमध्ये hold केले जातात.

  शेअर्सचे वाटप करणे (Allotment Process) – What is IPO in Marathi ?

IPO बंद झाल्यावर जर मागणी जास्त असेल तर लॉटरी पद्धतीने गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप (Allotment Process) केले जाते.  ज्यांना शेअर्स मिळतात त्यांच्या Demat Account मध्ये शेअर्स जमा होतात आणि ज्यांना शेअर्स मिळत नाही त्यांच्या Account मध्ये रुपये transfer केले जातात. म्हणजे त्यांना refund मिळतो.

शेअर बाजारात शेअरची लिस्टिंग होणे (Listing on Stock Exchange)

वरीलप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेअर बाजारात शेअरची लिस्टिंग (Listing on Stock Exchange) होते. संबंधित कंपनीचा हा शेअर Stock Market मध्ये NSE (National Security Exchange) किंवा BSE (Bombay Stock Exchange) अधिकृतरीत्या लिस्ट होतो. कंपनी जर चांगली असेल तर शेअरची किंमत Price Band पेक्षा जास्त राहते आणि शेअरची विक्री केल्यावर गुंतवणूकदारांना नफा होतो.

IPO चे प्रकार कोणते आणि किती आहेत ? Types of IPO – What is IPO in Marathi ?

IPO चे दोन मुख्य प्रकार पडतात. ते प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

1) फिक्स्ड प्राईस आयपीओ (Fixed Price IPO) –

या प्रकारात शेअरची किंमत अगोदरच निश्चित केलेली असते. संबंधित कंपनी आणि इन्व्हेस्टमेंट बँकर्स अगोदरच शेअरची किंमत ठरवितात. जसे 800 रुपये प्रती शेअर. शेअरची किंमत अशी अगोदरच ठरलेली असल्याने

गुंतवणूकदारांना बोली (Price Bidding) लावावी लागत नाही. या प्रकारात कंपनीला किती शेअर विकायचे आहेत हे अगोदरच स्पष्ट होते.

2) बुक बिल्डिंग आयपीओ (BOOK Building IPO) –

आजच्या घडीला या दुसऱ्या प्रकारचा म्हणजे बुक बिल्डिंग आयपीओ (BOOK Building IPO) शेअर बाजारात येत आहेत.  या प्रकारात शेअरची किंमत ठरलेली नसते. शेअरच्या किंमतीची एक श्रेणी (Price Band) ठरलेली असते.  जसे की 800 ते 820 रुपये. 800 रुपये ही किमान किंमत म्हणजे फ्लोअर प्राइस तर 820 रुपये कमाल किंमत म्हणजे कॅप प्राइस होय.

गुंतवणूकदार 800 ते 820 रुपये या दरम्यान बोली लावतात. शक्यतो जास्त नफा मिळाला पाहिजे म्हणून कमाल किंमतवरच गुंतवणूकदार बोली लावतात.

शेअरची किंमत कशी ठरते ?-

IPO बंद झाल्यावर त्या शेअरला किती मागणी आली आहे यावरून शेअरची अंतिम किंमत ठरते.

IPO शिवाय Fresh Issue म्हणजे नवीन शेअर्स शेअर बाजारात आणणे हा देखील एक प्रकार आहे. कंपनी शेअर बाजारात नवीन शेअर्स विक्रीस आणतात आणि त्यातून रुपये कमावून कंपनीमध्ये गुंतवतात. आणखी एक OFS हा प्रकार आहे. OFS म्हणजे Offer For Sale होय. यामध्ये कंपनीचे जुने मालक किंवा अगोदरचे मोठे गुंतवणूकदार आपले स्वतःचे शेअर्स विक्रीसआणतात आणि त्यातून नफा कमवितात. OFSद्वारे मिळणारा नफा कंपनीच्या खात्यात न जाता शेअर्स विकणाऱ्याला जातो.

निष्कर्ष : What is IPO in Marathi ?

मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेल की IPO हा एखाद्या कंपनीच्या व्यवसाय वाढीसाठी , भांडवल निर्मितीसाठी खास करून आणल्या जातो. त्यातून कंपनीचा व्यवसाय वाढीस मदत तर होतेच शिवाय सर्वसामान्य गुंतवणूकदारांना शेअर्स घेता येतात, नफा कमावता येतो.

परंतु मित्रांनो एक बाब ध्यानात घ्या की प्रत्येक IPO नफा देईलच असे नाही. IPO आणणाऱ्याकंपनीची आर्थिक स्थिती, कंपनीचा इतिहास आणि भविष्यातील वाटचाल, कंपनीचेसंचालक मंडळ या सर्व बाबीचा विचार करावा लागतो. म्हणून IPO घेतांना वरील सर्व घटकांचा अभ्यास करूनच IPO घ्यायचे ठरविणे संयुक्तिक राहील.

मित्रांनो तुम्हाला ऐतिहासिक लेख, गडकिल्ले, पर्यटन, मंदिरे, वारसा स्थळे याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या www.historicaltouch.com या website ला जरूर भेट द्या

 टीप : या लेखातील माहिती ही केवळ शैक्षणिक आणि सामान्य माहितीच्या उद्देशाने देण्यात आलेली आहे. मित्रांनो आम्ही तुम्हाला कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही. शेअर बाजार वा IPO मधील गुंतवणूक ही बाजारपेठेतील जोखमीच्या अधीन असते. कृपया कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या. तुमच्या कोत्याही नफा किंवा तोट्याला हा ब्लॉग जबाबदार असणार नाही.
Spread the love

1 thought on “IPO म्हणजे काय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती | What is IPO in Marathi ?”

Leave a Comment