डीमॅट अकाउंट म्हणजे काय आणि ते कसे उघडायचे ? | Demat Account in Marathi – A Complete Guide

डीमॅट अकाउंट म्हणजे काय आणि ते कसे उघडायचे ? | Demat Account in Marathi – A Complete Guide

Demat Account in Marathi - A Complete Guide

आजचे हे युग डिजिटल युग आहे . या डिजिटल युगात तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल वा ट्रेडिंग करून रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला कोठे जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या डीमॅट अकाउंटमार्फत ( Demat Account in Marathi – A Complete Guide ) स्वतःचे अकाउंट उघडू शकता. शेअर मार्केटमध्ये सुरुवात करण्यासाठी डीमॅट अकाउंट ही एक महत्वाची आणि सर्वात पहिली पायरी आहे. डीमॅट अकाउंटशिवाय तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करू शकत नाही. आजच्या या लेखात डीमॅट अकाउंटबाबत Demat Account in Marathi – A Complete Guide संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

1. डीमॅट अकाउंट (Demat Account) म्हणजे काय ? (What is Demat Account in Marathi

बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की, हे डीमॅट अकाउंट नेमके आहे तरी काय ? हे काम कसे करते ? त्यासाठी किती खर्च किती येतो ? हे डीमॅट अकाउंट सुरक्षित असते काय ? हे घरबसल्या आपल्या मोबाईलवर उघडता येते काय ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आम्ही आज देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

तुम्हाला एक साधे आणि सोपे उदाहरण देतो. तुमच्याकडे काही काही रक्कम रोख स्वरुपात आहे आणि तुम्हाला ती सुरक्षित ठेवायची आहे. चोरीच्या ,हरविण्याच्या वा खर्च होण्याच्या धाकाने तुम्हाला ती बँकेत ठेवावी लागेल. त्याकरिता तुम्हाला बँकेत तुमचे बचत खाते (Saving Account) उघडावे लागेल. आता तुमचे रुपये बँकेत डिजिटल स्वरुपात बँकेत सुरक्षित राहतील आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार ते युपये काढू शकाल.

नेमके अशाच प्रकारचे काम डीमॅट अकाउंट करते. ज्यावेळी तुम्हाला शेअर मार्केट एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे असतात त्यासाठी डीमॅट अकाउंट आवश्यक असते . जसे बँकेत रुपये ठेवण्यासाठी बचत खाते आवश्यक असते तसेच शेअर्स घेण्यासाठी डीमॅट अकाउंट जरुरी आहे. आणि तुम्ही विकत घेतलेले शेअर्स या डीमॅट अकाउंटमध्ये  सुरक्षित राहतात. तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही शेअर्स खरेदी वा विक्री करू शकता. अशा प्रकारे डीमॅट अकाउंट हे डिजिटल स्वरूपातील एक खाते असते.

Demat Account चा फुलफोर्म आहे Dematerialized Account असा आहे. याचा अर्थ कागदी स्वरूपातील गोष्टींचे इलेक्ट्रोनिक किंवा डिजिटल स्वरुपात रुपांतर करणे होय. पूर्वी 1996 अगोदर शेअर्स खरेदी केल्यावर कागदी सर्टिफिकेट मिळायचे. बऱ्याचदा ते कागदी सर्टिफिकेट खराब होणे, हरविणे, सही चुकणे अशा अडचणी यायच्या. त्यामुळे सरकारने Demat Account हे डिजिटल प्रारूप आणले. थोडक्यात असे म्हणता येईल की हे एक प्रकारचे डिजिटल लॉकर आहे त्यामध्ये तुम्ही खरेदी केलेले शेअर्स ,म्युच्युअल फंड , सरकारी रोखे (Government Securities) डिजिटल स्वरुपात सुरक्षित राहते.

हे ही वाचा : IPO म्हणजे काय ?

2. डीमॅट अकाउंट (Demat Account) कसे काम करते ? How Demat Account Works ?

डीमॅट अकाउंट हे कसे काम करते आता समजावून घेऊ या.  त्याकरिता तीन गोष्टी समजून घ्याव्या लागतील.

बँक अकाउंट (Bank Account) :

बँक अकाउंटमधून तुमचे रुपये डीमॅटमध्ये ट्रान्स्फर करावे लागतात. ट्रेडिंग अकाउंट मध्ये तुमचे रुपये जमा झाल्यावर त्या रुपयांमधून तुम्ही शेअर्सची खरेदी – विक्री करू शकता.

ट्रेडिंग अकाउंट (Trading Account) :

ट्रेडिंग अकाउंटद्वारे तुम्ही शेअर्सची खरेदी-विक्री करण्यासाठी ऑर्डर शकता.

डीमॅट अकाउंट (Demat Account) :

डीमॅट अकाउंटमध्ये तुम्ही खरेदी केलेले शेअर्स जमा होतात.

3. डीमॅट अकाउंटची कामकाजाची पद्धत : Demat Account in Marathi – A Complete Guide

ज्यावेळी तुम्ही एखादा शेअर खरेदी करत असता, तेव्हा ट्रेडिंग अकाऊंटद्वारे ती ऑर्डर stock exchange (NSE/BSE) कडे जाते. ती ऑर्डर पूर्ण झाल्यावर तो शेअर तुमच्या डीमॅट अकाउंट (Demat Account) मध्ये जमा होतो. तसेच जेव्हा तुम्ही शेअर विकता तेव्हा तो शेअर डीमॅट अकाउंट (Demat Account) मधून कमी होतो आणि त्याचे रुपये तुमच्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये  (Trading Account) जमा होतात. त्या ट्रेडिंग अकाउंटमधून तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये रुपये ट्रान्स्फर करू शकता.

4. डीमॅट अकाउंटचे प्रकार : Demat Account in Marathi – A Complete Guide

डीमॅट अकाउंटचे मुख्यता तीन प्रकार पडतात. हे प्रकार व्यक्तीच्या नागरिकत्व आणि त्याच्या गरजेनुसार पडत असतात. खालीलप्रमाणे डीमॅट अकाउंटचे ते तीन प्रकार आहेत.

A) नियमित डीमॅट अकाउंट  (Regular Demat Account) :

या प्रकारचे डीमॅट अकाउंट हे भारतात राहणाऱ्या लोकांसाठी असते.भारतीय नागरिक या प्रकारच्या डीमॅट अकाउंटद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतात.

B) रिपेट्रीयेबल डीमॅट अकाउंट (Repatriable Demat Account ) : Demat Account in Marathi – A Complete Guide

या प्रकारचे Demat Account फक्त NRI म्हणजे अनिवासी भारतीयांसाठी असते. रिपेट्रीयेबल डीमॅट अकाउंट (Repatriable Demat Account )अनिवासी भारतीय भारतातील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतात. ते भारतीय शेअर मार्केटमध्ये कमाई करून विदेशात रुपये सहज ट्रान्स्फर करू शकतात. मात्र यासाठी NRE बँक खाते लिंक करावे लागते.

C) नॉन-रिपेट्रीयेबल डीमॅट अकाउंट (Non-Repatriable Demat Account) : Demat Account in Marathi – A Complete Guide

नॉन-रिपेट्रीयेबल डीमॅट अकाउंट (Non-Repatriable Demat Account) हे देखील अनिवासी भारतीयांसाठी (NRI)असते. यात थोडा फरक आहे. गुंतवणूक करणाऱ्याला कमावलेला पैसा विदेशात ट्रान्स्फर करण्यासाठी NRO बँक खाते लिंक पाहिजे.

5. डीमॅट अकाउंट उघडण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ? (Documents required for opening Demat Account) : Demat Account in Marathi – A Complete Guide

डीमॅट अकाउंट उघडण्यासाठी पुढील कागदपत्रे लागतात.

ओळखीचा पुरावा ( Identity Proof ) :

ओळखीच्या पुराव्यासाठी Pan Card हे अनिवार्य आहे.

पत्त्याचा पुरावा (Address Proof) :

पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स , पासपोर्ट यापैकी कोणतेही एक कागदपत्र लागेल.

बँक अकाउंटचा पुरावा (Bank Proof):

बँक अकाउंटचा पुरावा देण्यासाठी कॅन्सल चेक , बँकेचे पासबुक किंवा 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट देणे बंधनकारक आहे.

इतर बाबी : Demat Account in Marathi – A Complete Guide

पासपोर्ट फोटो किंवा ऑनलाईन स्वतःचा फोटो, कोऱ्या कागदावर सही देणे आवश्यक आहे.

6. डीमॅट अकाउंट (Demat Account) कसे उघडावे ? How to Open a Demat Account ?

डीमॅट अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरबसल्या डीमॅट अकाउंट उघडू शकता. सध्या भारतात बऱ्याच ब्रोकर कंपन्यांचे प्स आहेत.  तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्सनुसार घरबसल्या डीमॅट अकाउंट उघडू शकता.

स्टेप 1 :

सर्वात अगोदर तुम्ही एक चांगला Stock Broker निवडा. भारतात Angel One, Zerodha, Upstock, अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत. त्यांचे प प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करता येते. तुम्ही त्यापैकी कोणतेही एक डाऊनलोड करा.

स्टेप 2 :

तो पडाऊनलोड केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि इमेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन करा.

स्टेप 3 :

पुढे Pan Card नंबर आणि तुमची जन्मतारीख बिनचूक भरा.

स्टेप 4 :

मग बँक अकाउंट व्हेरीफाय करण्यासाठी बँक अकाउंट नंबर IFSC CODE सह टाका.

स्टेप 5 :

KYC ची माहिती भरा. आई-वडिलांचे नाव, वार्षिक उत्पन्न इत्यादी.

स्टेप 6 :

DIGILOCKER ने तुमचे आधार कार्ड सबमिट करा.

स्टेप 7 :

मोबाईलवर एक छोटा स्वतःचा व्हिडीओ रेकॉर्ड करा.

स्टेप 8 :

आधार कार्ड नंबर टाकून OTP द्वारे e-sign करा.

48 तासांच्या आत तुमचे डीमॅट अकाउंट सक्रीय होते. युझर नेम आणि पासवर्ड बदलू शकता.

7. डीमॅट अकाउंटचा खर्च (Demat Account Charges) : Demat Account in Marathi – A Complete Guide

काही ब्रोकर कंपन्या अकाउंट ओपनिंग चार्जेस 200 ते 300 रुपये घेतात तर काही निशुल्क डीमॅट अकाउंट ओपन करून देतात. अकाउंट मेंटेनन्स चार्जेस दरवर्षी 200 ते 400 रुपये घेतात. तुमच्या शेअरच्या खरेदी- विक्रीसाठी ब्रोकरेज चार्जेस कंपन्या वेगवेगळे घेतात.

8. भारतातील काही प्रमुख ब्रोकर कंपन्या कोणत्या ? Demat Account in Marathi – A Complete Guide

भारतातील काही प्रमुख ब्रोकर कंपन्यामध्ये Angel One, Zerodha, Upstock, Groww, SBI Securities, Kotak Securities, ICICI Direct, 5 Paisa, Sharekhan, Motilal Oswal, Axis Direct अशा बऱ्याच ब्रोकर कंपन्यांचा समावेश होतो.

मित्रांनो आजच्या Demat Account in Marathi – A Complete Guide या लेखात आपण डीमॅट अकाउंटबाबत माहिती जाणून घेतली. तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास करून ब्रोकर कंपनीची निवड करा. कोणाच्याही सांगण्यावरून शेअर मार्केटमध्ये तुमच्या मेहनतीचा पैसा गुंतवू नका. अगोदर व्यवस्थित अभ्यास करा आणि मगच या शेअर मार्केटच्या महासागरात उडी घ्या.

मित्रांनो तुम्हाला जर इतिहासाची आवड असेल तर आमच्या http://www.historicaltouch.com या वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकता.

टीप : या लेखातील माहिती ही केवळ शैक्षणिक आणि सामान्य माहितीच्या उद्देशाने देण्यात आलेली आहे. मित्रांनो आम्ही तुम्हाला कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही. शेअर बाजार वा IPO मधील गुंतवणूक ही बाजारपेठेतील जोखमीच्या अधीन असते. कृपया कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या. तुमच्या कोत्याही नफा किंवा तोट्याला हा ब्लॉग जबाबदार असणार नाही.
Spread the love

Leave a Comment