शेअर मार्केट म्हणजे काय ? नवशिक्यांसाठी संपूर्ण माहिती | Share Market Basics In Marathi

शेअर मार्केट म्हणजे काय ? नवशिक्यांसाठी संपूर्ण माहिती | Share Market Basics In Marathi

Share Market Basics In Marathi
source : Google Images

आपण बऱ्याचदा मित्रांमध्ये किंवा बातम्यांमध्ये ऐकतो कि “आज शेअर मार्केट वाढलं”, “निफ्टीन रेकॉर्ड केला”, “अमूक कंपनीचा शेअर वाढला”, “उद्या मार्केट बुलीश राहील”. तुम्हाला हे ऐकून प्रश्न पडला असेल की, हे नेमके काय आहे? मी यामध्ये सुरुवात करावी का ?  मी देखील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू का ?  जर तुमच्या मनात असे विचार येत असतील आणि  तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायची असेल तर अगोदर शेअर मार्केटविषयी (Share Market Basics In Marathi) संपूर्ण माहिती तुम्हाला घ्यावी लागणार आहे. आजच्या या लेखात आपण शेअर मार्केटविषयी संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर जाणून घेऊ या शेअर मार्केटविषयी सविस्तर माहिती.

1) शेअर मार्केट म्हणजे नक्की काय आहे ? (What is Share Market ?) : Share Market Basics In Marathi

शेअर या शब्दाचा अर्थ होतो हिस्सा किंवा वाटा आणि मार्केट म्हणजे बाजार. बाजारात काय होत असते ? खरेदी – विक्री. जसे भाजी बाजारात भाजीपाला खरेदी – विक्री होतो त्याचप्रमाणे शेअर बाजारात शेअरची खरेदी विक्री होत असते. शेअर मार्केटमध्ये कोणी शेअर विकतो तर कोणी शेअर विकत घेत असतो. शेअर मार्केटमध्ये विविध कंपन्या आहेत. त्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी -विक्री शेअर मार्केटमध्ये चालत असते.

2) शेअर खरेदी करणे म्हणजे काय असते ?  : Share Market Basics In Marathi

शेअर मार्केटमध्ये जेव्हा एखादा व्यक्ती कोणताही एखाद्या कंपनीचा शेअर विकत घेतो तेव्हा तो व्यक्ती त्या कंपनीचा सहमालक बनत असतो. म्हणजेच त्या व्यक्तीचा त्या कंपनीत काही टक्के वाटा असतो. समजा त्या कंपनीने चांगला नफा कमविला आणि लाभांश दिला तर त्या व्यक्तीला त्याचाकडे असलेल्या शेअरच्या नुसार नफ्याचा काही वाटा दिला जातो. कंपनीच्या  शेअरची किंमत वाढली आणि त्या व्यक्तीने तो शेअर तर त्याला नफा होतो. याउलट कंपनीचा शेअरची किंमत कमी झाली आणि तर त्या व्यक्तीला नुकसान होते.

हे ही वाचा : IPO म्हणजे काय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती | What is IPO in Marathi ?

3) कंपन्या शेअर मार्केटमध्ये का येतात ? (Why Companies enters in Share Market ?) :

शेअर मार्केटमध्ये कंपन्या का येतात आता आपण समजून घेऊ या. एखाद्या कंपनीला आपल्या व्यवसायात वाढ करायची असते. तेव्हा ती कंपनी सेबीमध्ये नोंदणी करते आणि आपल्या कंपनीचे शेअर्स मार्केटमध्ये आणते. आता त्या कंपनीचे शेअर्स सर्वसामान्य गुंतवणूकदार विकत घेतात. त्यामुळे त्या कंपनीच्या भांडवलामध्ये वाढ होते आणि त्या भांडवलाचा उपयोग करून कंपनी आपल्या व्यवसायात वाढ करते. या बदल्यात त्या कंपनीचे शेअर्स विकत घेणारे त्या कंपनीचे भागीदार बनतात.

4) भारतातील शेअर मार्केट कोठे चालतो ?  निफ्टी (NSE) आणि सेन्सेक्स (BSE) म्हणजे काय ?

भारतात दोन मोठे स्टॉक एक्सचेंज (Stock Exchange) आहेत. त्यामध्ये शेअर्सची खरेदी-विक्री होत असते. एक निफ्टी (NSE) दुसरा सेन्सेक्स (BSE) आहे. हे दोन्हीही मुंबईमध्ये आहे. NSE म्हणजे National Stock Exchange होय. यामध्ये एकूण आघाडीच्या 50 कंपन्या  असतात. तर BSE Bombay Stock Exchange होय. यामध्ये देखील आघाडीच्या 30 कंपन्या असतात. ज्या कंपन्या प्रगती करीत असतात, ज्यांचे भागभांडवल खूप मोठे असते त्या कंपन्यांचा समावेश निफ्टी आणि सेन्सेक्सयामध्ये असतो.

5) शेअर मार्केटवर कोणाचे नियंत्रण असते? SEBI

तुम्हाला प्रश्न पडला असेल कि शेअर मार्केटमध्ये अब्जो रुपयांचा व्यवहार होत असतो. त्यात सर्वसामान्य व्यक्ती आपल्या मेहनतीचे पैसे एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतो. आपण कधीही त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये गेलो नसतो आणि त्या कंपनीचे शेअर्स आपण विकत घेतो. तेव्हा आपल्या पैशांची आणि शेअर्सची हमी काय आहे ? त्यांच्या सुरक्षितेची जबाबदारी कोण घेईल ? तर याचे उत्तर आहे सेबी (SEBI). सेबी म्हणजे Securities and Exchange Board of India आहे.सेबी ही एक सरकारी संस्था आहे. सेबी ही सरकारी संस्था NSE आणि BSE या दोन्हीवर नियंत्रण ठेवते. सेबीचे नियम हे खूप कडक आहेत. त्यामुळे कोणतीही कंपनी फसवणूक करून सर्वसामान्यांचे मेहनतीचे पैसे हडप करू शकत नाही.

6) शेअर मार्केटचे प्रकार (Types of Share Market) : Share Market Basics In Marathi

प्रामुख्याने शेअर मार्केटचे दोन प्रकार पडतात. एक प्रायमरी मार्केट (Primary Market) आणि दुसरा म्हणजे सेकंडरी मार्केट (Secondary Market). प्रायमरी मार्केटमध्ये एखादी कंपनी आपले शेअर्स पहिल्यांदाच शेअर मार्केटमध्ये आणतात तेव्हा त्याला IPO (Initial Public Offering) असे म्हणतात. तर सेकंडरी मार्केटमध्ये IPO आणलेल्या कंपनीचे शेअर्स लिस्ट झाल्यावर सर्वसामान्य गुंतवणूकदार , ट्रेडर त्या कंपनीचे शेअर्स खरेदी-विक्री करू शकतात.

प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट या शिवाय कमोडिटी (commodity) हा देखील एक प्रकार आहे. यामध्ये साधारणता gold, silver, natural gas, oil,  इत्यादीचा व्यवहार चालतो.

7) गुंतवणूक आणि ट्रेडिंग यामधील फरक : ( Difference Between Trading and Investment)

गुंतवणूक आणि ट्रेडिंग यामधील फरक आता आपण पाहू या. अनेकजणांना असे वाटते की, गुंतवणूक आणि ट्रेडिंग एकच आहे.पण मित्रांनो यामध्ये खूप मोठा फरक आहे. आपण एखादा प्लॉट विकत गुंतवणूक म्हणून विकत घेतो. ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी असते जेव्हा चांगला प्लॉटचा चांगला भाव मिळेल तेव्हाच आपण तो विकतो. तो केव्हा विकावा याचे बंधन आपल्यावर नसते. याउलट ट्रेडिंग आहे. यात शेअर्स काही मिनिटांसाठी, काही तासांसाठी खरेदी-विक्री जातात. याला Intraday Trading असे म्हटले जाते. हा व्यवहार दुपारला 3.15 च्या आत पूर्ण करावा लागतो. यामध्ये जोखीम खूप जास्त असते. Intraday Trading शिवाय Swing Trading हा देखील एक ट्रेडिंगचा एक प्रकार आहे. शिवाय Options, Future यामध्ये सुद्धा ट्रेडिंग चालत असते.

8) शेअर मार्केटमध्ये कसं काम चालते ? How Share Market Works : Share Market Basics In Marathi

आता आपण पाहू या कि शेअर मार्केटमध्ये कामकाज कसे चालते. भारतातील शेअर मार्केट आठवड्यातून पाच दिवस चालते. शनिवार आणि रविवारी शेअर मार्केट बंद राहते. शिवाय राष्ट्रीय सुटीच्या ( National holiday) दिवशी देखील शेअर मार्केट बंद राहते.

working day ला सकाळी 9 ला निफ्टी आणि सेन्सेक्स खुले (open) होतात. 9.07 ला stocks open होतात. त्यानंतर प्रत्यक्षात 9.15 शेअर्सची खरेदी-विक्रीला सुरुवात होते. जे कोणी Intraday Trading मध्ये व्यवहार करीत असतील त्यांना दुपारला 3.15 पर्यंत आपला व्यवहार पूर्ण करावा लागतो. त्यानंतर 3.30 ला शेअर मार्केट बंद होते.

कमोडिटीचे  (commodity)  दोन कार्यकाळ आहेत. सकाळी 9.०० ते 5.०० आणि पुढे 5.०० ते रात्री 11.30 काही विशिष्ट वेळी कमोडिटीचे कामकाज चालते.

मित्रांनो तुम्हाला आमचा Share Market Basics In Marathi हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा.

तुम्हाला ऐतिहासिक लेख आवडत असतील तर आमच्या http://www.historaicaltouch.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

टीप : या लेखातील माहिती ही केवळ शैक्षणिक आणि सामान्य माहितीच्या उद्देशाने देण्यात आलेली आहे. मित्रांनो आम्ही तुम्हाला कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही. शेअर बाजार वा IPO मधील गुंतवणूक ही बाजारपेठेतील जोखमीच्या अधीन असते. कृपया कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या. तुमच्या कोत्याही नफा किंवा तोट्याला हा ब्लॉग जबाबदार असणार नाही.

 

Spread the love

1 thought on “शेअर मार्केट म्हणजे काय ? नवशिक्यांसाठी संपूर्ण माहिती | Share Market Basics In Marathi”

Leave a Comment